बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यात दोन बैलांचा पडीक विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.


सवदत्ती तालुक्यातील तेग्गीहाळ गावात ही घटना घडली. गावातील शेतकरी सुरेश सिद्धप्पा जंबगी यांच्या मालकीचे दोन बैल नेहमीप्रमाणे चरण्यासाठी गेले होते. दरम्यान, शेतात असलेल्या एका खुल्या, वापरात नसलेल्या पडीक विहिरीमध्ये दोन्ही बैल अचानक कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बैलांचा असा अचानक अंत झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी आक्रोश केला. या घटनेची नोंद सवदत्ती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


Recent Comments