उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिराच्या हुंडीत कोट्यवधी रुपयांचे दान जमा झाले आहे. मात्र, या दानाच्या रकमेसोबतच एका भक्ताने देवीला लिहिलेल्या अनोख्या पत्राने सर्वांचे लक्ष वेधले आहे.


बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात उगरगोळजवळ असलेल्या यल्लम्मा डोंगरावरील मंदिरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली हुंडी मोजणी बुधवारी पूर्ण झाली. ७ मे ते १० ऑक्टोबर या कालावधीत भक्तांनी अर्पण केलेल्या दानाची मोजणी करण्यात आली. आतापर्यंत २ कोटी ६९ लाख रुपयांचे दान जमा झाले आहे. यामध्ये २ कोटी ३४ लाख रुपये रोख, २६ लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ७ लाख ३२ हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. एकूण १३९ पोत्यांपैकी ५४ पोत्यांची मोजणी पूर्ण झाली असून, उर्वरित ८५ पोत्यांची मोजणी अद्याप बाकी असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.


या मोजणीदरम्यान एका भक्ताने हुंडीत टाकलेले अनोखे पत्र आढळून आले. घरातील ढेकूणांचा त्रास दूर व्हावा, यासाठी भक्ताने देवीकडे साकडे घालत त्रास दूर झाल्यास मंदिरात फळे अर्पण करण्याचा नवस केला आहे. या आगळ्यावेगळ्या नवसाची मोजणी कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्येही चर्चा रंगली आहे.



Recent Comments