मतदार यादीतून बेकायदेशीरपणे नावे वगळली जात असल्याचा आरोप करत ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी बेंगळुरूतील फ्रीडम पार्क येथे आंदोलन केले. ‘मतचोरी थांबवा, देश वाचवा’ अशी घोषणा देत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला.

या आंदोलनात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सहभागी होत एसआयआर प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मतदार यादीतून बेकायदेशीरपणे वगळलेली नावे तातडीने पुन्हा समाविष्ट करावीत, अशी मागणी त्यांनी केली. मृत मतदार वगळता यादीतून वगळलेल्या प्रत्येक पात्र मतदाराला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.



या आंदोलनात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद, एआयसीसी निरीक्षक पल्लम राजू, सचिव गोपीनाथ पलनियप्पन यांच्यासह विविध संघटनांचे नेते सहभागी झाले. शेतकरी संघटनेचे वीरसंगय्या, सीपीआयचे साती सुंदरश, सीपीआय-एमएल लिबरेशनचे क्लिफ्टन रोसारियो, के. नीला, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश के. आणि अभिनेते प्रकाश राज यांनीही मतदारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी एकजूट दाखवली.



Recent Comments