State

कनकपुरा रोडवर आयकियाच्या नव्या भव्य दालनाचे उद्घाटन

Share

बंगळुरूच्या कनकपुरा रोडवर जागतिक स्तरावरील फर्निचर कंपनी आयकियाच्या नव्या दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यातील मंत्री आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गुरुवारी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आयकियाच्या नव्या भव्य दालनाचे उद्घाटन केले. यावेळी माहिती तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे, आयकिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक अँथनी, दक्षिण भारतातील स्वीडनचे कॉन्सुल जनरल अरुण वासू आणि जागतिक गुंतवणूक विभागाचे सचिव एस. एस. नकुल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांनी नव्या दालनाच्या विस्ताराबद्दल शुभेच्छा दिल्या.

Tags: