State

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वात प्रगती आढावा बैठक संपन्न

Share

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज विधानसौध येथे सर्व जिल्हाधिकारी आणि मंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक घेतली. या प्रगती आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांमधील पूर्वतयारीचा आढावा , तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत.

विधानसौधच्या परिषद सभागृहात आज मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्हाधि

कारी (DC), जिल्हा पंचायत सीईओ, पोलीस अधीक्षक (SP) आणि उप वनसंरक्षकांची महत्त्वाची बैठक पार पडली. पावसाळा सुरू झाल्याने सर्व जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने सतर्क राहावे आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

या उच्चस्तरीय बैठकीला मंत्री रामलिंगा रेड्डी, के. एच. मुनियप्पा, के. जे. जॉर्ज, सतीश जारकीहोळी, ईश्वर खंड्रे, एम. बी. पाटील, प्रियांक खर्गे , कृष्णा बैरेगौडा आणि मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यालयात स्वतंत्र बैठक घेऊन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शालेय व अंगणवाडी मुलांची प्रवेश प्रक्रिया आणि त्यांच्या आरोग्य स्थितीचाही आढावा घेतला.

Tags: