Dharwad

धारवाडमध्ये अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी सीपीआय निलंबित

Share

धारवाड तालुक्यातील गरग येथे एका अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गरग पोलीस ठाण्याच्या सीपीआयना निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

८ मे रोजी धारवाड तालुक्यातील गरग गावात एका अल्पवयीन मुलीने ‘लव्ह जिहाद’ आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. गरग गावातील नईम आणि सोहेल मुल्ला या दोन तरुणांनी मुलीला जाळ्यात ओढून, तिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. या प्रकारामुळे खचून जाऊन अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते.

घटनेनंतर सुरुवातीला मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार देऊनही आरोपींना अटक करण्यात पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप झाला होता. विविध संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत संताप व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. मात्र, या प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासात हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गरग पोलीस ठाण्याचे सीपीआय शिवयोगी लोहार यांना आता निलंबित करण्यात आले आहे.

Tags: