Dharwad

लव्ह जिहाद प्रकरणी धारवाडमध्ये नागरिकांचा तीव्र संताप

Share

धारवाडमधील गरग गावात घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला असून, एका अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

धारवाड तालुक्यातील गरग गावातील पौर्णिमा या अल्पवयीन दलित मुलीला गावातीलच नहीम बेग आणि सोहेल मुल्ला या दोन मुस्लिम तरुणांनी लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर शारीरिक संबंध ठेवून ते फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यामुळे मुलीने आत्महत्या केली. सुरुवातीला पीडित कुटुंबाने तक्रार देऊनही आरोपींना अटक करण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी दलित आणि हिंदू संघटनांनी एकत्र येत आंदोलन छेडले आहे.

संघटनांनी या प्रकरणात लक्ष घालताच नागरिकांचा आक्रोश वाढला, त्यानंतर गरग पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मात्र, या दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यादृष्टीनेच पुढील तपास झाला पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सामाजिक घटकांनी एका निष्पाप मुलीचा जीव घेतला असून, इतर कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये म्हणून या प्रकरणाचा सखोल तपास करून पीडित कुटुंबाला न्याय मिळायला हवा. तपासामध्ये निष्काळजीपणा आढळल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारला दिला आहे.

Tags: