बेळगावमध्ये एका महिलेचे खाजगी फोटो तिच्या पतीसह नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठवून मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून एका युवकाविरुद्ध बेळगावमधील सीईएन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेळगावमधील एका महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शिवमोग्गा जिल्ह्यातील रहिवासी सुनील अडगट्टी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीने महिलेचे खाजगी फोटो मोबाईलमध्ये टिपून घेतले होते आणि अलीकडच्या काळात हे फोटो महिलेच्या पती, भाऊ आणि इतर जवळच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सॲपवर पाठवून तिचा मानसिक छळ सुरू केला होता. महिलेची गोपनीयता भंग करून तिची मानहानी करण्याच्या उद्देशानेच हे कृत्य करण्यात आले असून, सायबर गुन्ह्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात सीईएन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी संशयिताविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.



Recent Comments