Uncategorized

धारवाडमधील विद्यार्थी अनमोल प्रभू याची घवघवीत कामगिरी

Share

कर्नाटक सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून धारवाडमधील एका विद्यार्थ्याने एकापाठोपाठ एक रँक्स मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. धारवाडमधील अर्जुन पीयू कॉलेजचा विद्यार्थी अनमोल प्रभू याच्या या घवघवीत यशामुळे कॉलेजचे प्रशासन, शिक्षक आणि कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून कॉलेजमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला.

धारवाडमधील सत्तूर परिसरातील रहिवासी असलेल्या अनमोल प्रभू याने सीईटी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत कृषी आणि पशुवैद्यकीय विभागात राज्यात दुसरा रँक पटकावला आहे. यासोबतच त्याने नर्सिंग विभागात आठवा रँक, योग आणि नॅचुरोपॅथीमध्ये नववा रँक तर पशुवैद्यकीय स्वतंत्र विभागात दहावा रँक मिळवून विविध विभागांच्या पहिल्या दहा क्रमांकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. धारवाडमधील प्रसिद्ध डॉक्टर दांपत्य डॉ. अविनाश प्रभू आणि डॉ. मृदुला प्रभू यांचा मुलगा असलेल्या अनमोलच्या या यशामुळे त्याने शिक्षण घेतलेल्या अर्जुन पीयू कॉलेजमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कॉलेज प्रशासन, वर्गमित्र आणि शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थी अनमोल प्रभू आणि त्याच्या आईला पेढे भरवून व पुष्पगुच्छ देऊन हा आनंद साजरा केला.

Tags: