चिकोडी आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे

गेल्या काही दिवसांपासून तीव्र ऊन आणि उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या चिकोडी शहर आणि आसपासच्या भागातील नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसरात गारवा निर्माण झाला असून वातावरणात आल्हाददायक बदल झाला आहे.

पावसाचा जोर इतका होता की शहरातील मुख्य रस्ते आणि गटारे तुडुंब भरून वाहू लागली. अवघ्या काही तासांत झालेल्या या मुसळधार पावसामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. बस स्थानक, इंदिरानगर, बसवेश्वर चौक, अंकली कूट या प्रमुख भागांत जोरदार पाऊस झाला असून बस स्थानक आणि अंकली कूट या गजबजलेल्या भागांतील नागरिकांना आडोशासाठी दुकानांचा आसरा घ्यावा लागला.
एकंदरीत या अचानक आलेल्या पावसामुळे वाहतुकीत काही काळ अडथळा निर्माण झाला असला तरी कडक उन्हामुळे हैराण झालेल्या चिकोडीमधील जनतेला या पावसामुळे सध्यातरी मोठा दिलासा मिळाला आहे.


Recent Comments