Belagavi

बेळगाव न्यायालय परिसरात भव्य स्वागत कमानीचे उद्घाटन

Share

बेळगावमधील नवीन न्यायालयीन संकुलासाठी उभारण्यात आलेल्या नूतन स्वागत कमानीचे आणि प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश मंजुनाथ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन प्रवेशद्वारामुळे न्यायालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कन्नड साहित्य भवनाशेजारी हे नवीन न्यायालयीन संकुल आहे. या संकुलाच्या नूतन स्वागत कमानीचे आणि प्रवेशद्वाराचे लोकार्पण जिल्हा न्यायाधीश मंजुनाथ नाईक यांनी केले. राणी चन्नम्मा चौक मार्गावरून न्यायालयात येणाऱ्या लोकांसाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. यापूर्वी नागरिकांना प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या एकमेव प्रवेशद्वारातून न्यायालयात यावे लागत होते. मात्र, आता या नवीन प्रवेशद्वारामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.

या उद्घाटन प्रसंगी विभिन्न क्षेत्रातील मान्यवर, बार असोसिएशनचे सदस्य आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: