बेळगावमधील शहापूर येथील बसवण गल्लीमध्ये श्री महालक्ष्मी देवीचा ११४ वा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या जन्मोत्सवानिमित्त सकाळी विविध धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर गणेशपूर गल्ली आणि बसवण गल्ली या मुख्य मार्गांवरून कुंभ मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर देवीची पालखी काढण्यात आली आणि पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी संपन्न झाले. दुपारी महाआरतीनंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी भाविकांनी श्री महालक्ष्मी देवीचा ११४ वा जन्मोत्सव सोहळा साजरा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
हा यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी पुजारी कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.


Recent Comments