बेळगावमधील प्रसिद्ध कॅम्प भागातील सेंट अँथनी चर्चमध्ये भक्तांच्या प्रार्थना आणि ध्यानासाठी नूतन आराधना केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

बेळगावमधील कॅम्प भागातील ऐतिहासिक सेंट अँथनी चर्च आवारात भक्तांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या पवित्र आराधना केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी फित कापून केले. ख्रिश्चन बांधवांची अनेक दिवसांची मागणी असलेल्या या सुसज्ज आराधना मंदिरामुळे भक्तांना शांतता आणि आध्यात्मिक चिंतनासाठी योग्य जागा मिळणार आहे. या वेळी विशेष प्रार्थना केल्यानंतर, आराधना मंदिराचा मुख्य उद्देश भक्तांनी देवाशी मौन साधणे हाच आहे, असे मार्गदर्शन बिश्प डेरिक फर्नांडिस यांनी केले.

बिशप डेरिक फर्नांडिस यांच्या उपस्थितीत झालेल्या या धार्मिक सोहळ्याला पाद्री विजय मडिंथ, फादर फिलीप कुट्टी, फादर जॉय आणि फादर प्रमोद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments