Bagalkot

बागलकोटमध्ये पोलिसांचा राऊडी शिटर्सना दणका मध्यरात्री राऊडी शीटर्सच्या घरावर छापेमारी

Share

बागलकोट जिल्ह्यात राऊडी शिटर्सवर वचक ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर विविध पोलीस पथकांनी जिल्ह्यातील राऊडी शिटर्सच्या घरांवर छापेमारी करून तपासणी केली.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष पथके तयार करून पहाटेच्या वेळी ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी घातक शस्त्रे आणि कागदपत्रे नसलेली संशयास्पद वाहने पोलिसांच्या हाती लागली आहेत.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने राऊडी शिटर्सच्या घरातील प्रत्येक कोपऱ्याची कसून तपासणी केली. तसेच त्यांच्या वैयक्तिक नोंदी आणि हालचालींचा आढावा घेण्यात आला.

पुन्हा गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील समाजकंटकांचे धाबे दणाणले असून, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Tags: