प्रभू श्रीरामचंद्र यांच्या संदर्भात प्राध्यापक के. एस. भगवान यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्रमोद मुतालिक यांनी प्रा. भगवान यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आहे. भगवान यांचे वक्तव्य संविधानाच्या विरोधी असून, यामुळे हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्या गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. शासनाने यावर स्वतःहून गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अन्यथा हिंदू देवी-देवतांचा अवमान करणाऱ्यांची जीभ छाटली जाईल, असा इशारा मुतालिक यांनी दिला.

कर्नाटकच्या राजकीय घडामोडींवर बोलताना मुतालिक यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हिंदुत्वाबाबतच्या भूमिकेचे स्वागत केले. मागील मुख्यमंत्र्यांनी विशिष्ट घटकांचे लाड केल्यामुळे राज्यात अनुचित प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे नवीन मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही एका घटकाची पाठराखण न करता राज्यातील सर्व नागरिकांना समान न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.


Recent Comments