Bagalkot

बागलकोटमध्ये रस्ते अपघातात सैनिकाचा मृत्यू

Share

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यात झालेल्या रस्ते अपघातात सीमा सुरक्षा दलाचे जवान महादेश डवळापूर (वय २७) यांचा मृत्यू झाला आहे. आठवड्यापूर्वीच ते सुट्टीवर आपल्या कुंचनूर गावामध्ये आले होते.

महादेश डवळापूर हे दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या टिप्पर ट्रकचा अंदाज चुकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. या दरम्यान त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या कारशी त्यांची थेट धडक झाली. या अपघातामध्ये गंभीर दुखापत झाल्याने महादेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

गेल्या ५ वर्षांपासून ते देशसेवा करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि पत्नी असा परिवार आहे. महादेश यांच्या निधनामुळे कुंचनूर गावावर शोककळा पसरली आहे.

जवान महादेश डवळापूर यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणल्यानंतर नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर लष्करी आणि शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: