धारवाडमधील कित्तूर राणी चन्नम्मा नगर येथील मुख्य रस्त्यावर रविवारी वादळी पावसामुळे एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली.

धारवाड शहरात रविवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे राणी चन्नम्मा नगर येथील मुख्य रस्त्यावरील एक मोठे झाड उन्मळून रस्त्यावर आडवे पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. घटना घडून बराच वेळ झाला तरीही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव न घेतल्याने आणि रस्त्यावरील झाड बाजूला न केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

झाड कोसळले त्या वेळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारवर हे झाड कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.


Recent Comments