जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संकेश्वर शहरातील नवीन वसाहतीमध्ये आमदार निखिल कत्ती यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वनमहोत्सव साजरा करण्यात आला.


हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरातील राम मंदिराशेजारी हा उपक्रम पार पडला. संकेश्वर नगरपालिका आणि हुक्केरी वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या वनमहोत्सवाचे उद्घाटन हुक्केरीचे आमदार निखिल कत्ती यांनी रोपट्याला पाणी घालून केले.


या प्रसंगी संकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश मठद, वन अधिकारी बी. एल. सनदी, विद्युत संघाचे संचालक नंदू मूडशी, रोहन नेसरी, सुनील पर्वतराव, गजानन कोळ्ळी, विक्की कोळ्ळी, डॉ. सुरेश कत्ती, सचिन सपाटे, सचिन भोपळे, कुमार बस्तवाडे, नगरपालिकेचे श्रीधर बेळवी, कुडबाळे मॅडम, अंजना पाटील, आर. व्ही. मुरारी यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.


Recent Comments