धारवाड स्वतंत्र महानगरपालिकेच्या मागणीसाठी ज्येष्ठ वकील बी. डी. हिरेमठ यांनी धारवाड महापालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात आता भाजपच्या युवा नेत्यांनीही उडी घेतली असून, आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.

धारवाड येथे स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करावी या मागणीसाठी ज्येष्ठ वकील बी. डी. हिरेमठ यांनी धारवाड महापालिका कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात आता भाजपच्या युवा नेत्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवल्यामुळे या लढ्याला अधिक बळ मिळाले आहे.
—
भाजपचे युवा नेते सदाशिव भजंत्री, नागराज नाईक, शफी विजापुरी, नागेश माळगी आणि दत्तगुरू वाडकर यांनी आज प्रत्यक्ष उपोषणाला सुरुवात केली आहे. धारवाडमधील प्रत्येक लहान-मोठ्या संघटनांनी आधीच या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, आता राजकीय पक्षांचे नेतेही स्वतंत्र महापालिकेच्या मागणीसाठी या आंदोलनात सामील होत आहेत.

या आंदोलनाला भाजप, काँग्रेस आणि जेडीएससह अनेक संघटनांनी व्यापक पाठिंबा दर्शवला आहे. ज्येष्ठ आंदोलक बी. डी. हिरेमठ, मनोज पाटील, व्यंकटेश माचकानूर, महादेव होरट्टी आणि शिवशंकर हंपण्णावर या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. दिवसागणिक या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढत असून आंदोलकांची ताकद अधिक मजबूत होत आहे.


Recent Comments