जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त बैलहोंगल शहरात विविध शासकीय विभाग आणि आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती रॅली व माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


श्री प्रभू नीलकंठ महास्वामीजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली बैलहोंगलमधील एस. एस. व्ही. व्ही. संस्थेच्या एस. जी. व्ही. आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष बागडे आणि बैलहोंगल तालुका आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. एस. सिद्दनवर यांनी जनजागृती रॅलीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. ही रॅली विविध घोषणा देत प्रमुख मार्गावरून चन्नम्मा चौकापर्यंत पोहोचली. या ठिकाणी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकणारे एक प्रभावी पथनाट्य सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा आणि तालुका आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, तालुका शासकीय रुग्णालय आणि एस. जी. व्ही. आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.


व्यासपीठ कार्यक्रमात उप जिल्हा आरोग्य शिक्षण अधिकारी प्रकाश माने यांनी तंबाखू प्रतिबंधक कायदा आणि नियमावली याविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी तालुका ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक दत्तात्रेय जेंढकर उपस्थित होते. तसेच आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. जगदीश गिरितम्मनवर, डॉ. व्यंकटेश नायक, डॉ. सुरेखा खोत, डॉ. जगदीश अराळीकट्टी, डॉ. प्रशांत बंडी, ई. बसनाईक, रुद्रनाईकर, डॉ. सुष्मा मारीहाळ, डॉ. शरद मडीवाळर, डॉ. नागराज मड्डीमनी, आदर्श एच. एस., डॉ. तृप्ती होसमनी, जयराम, डॉ. चहना, डॉ. शिल्पा नागनूर आणि डॉ. ज्योती यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. एन. एस. एस. अधिकारी डॉ. श्रीनिवास कांबळे यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले, तर डॉ. मंजुळा तुरमरी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी कॅम्प अधिकारी डॉ. नागराज कंबार यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Recent Comments