केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ धारवाडमध्ये एसयूसीआय (SUCI) च्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला. इंधनाचे दर त्वरित कमी करावेत, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.

धारवाडमधील विवेकानंद चौकात गोळा झालेल्या आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. युद्धाचे कारण पुढे करून चार वेळा इंधन दरवाढ करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य समन्वय साधून दरवाढ नियंत्रणात ठेवणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे सांगत तात्काळ दर कमी न केल्यास देशव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एसयूसीआय संघटनेच्या वतीने देण्यात आला.



Recent Comments