बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी शहराच्या बाहेरील भागात मोकाट कुत्र्यांच्या एका झुंडीने मेंढ्यांच्या कळपावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात ६ कोकरांचा जागीच मृत्यू झाला असून, ८ कोकरे गंभीर जखमी झाली आहेत, तर ५ कोकरे बेपत्ता झाली आहेत. या घटनेमुळे पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हा हल्ला स्थानिक मेंढपाळ अजित लगमण्णा पूजेरी यांच्या कोकरांवर झाला असून, यामुळे या गरीब कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी हुक्केरी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना अनेकदा विनंत्या करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा संतापजनक आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांच्या नेत्यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि नुकसानग्रस्त मेंढपाळ अजित पूजेरी यांना शासनाने तातडीने आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी केली. नुकसानभरपाई न मिळाल्यास मृत कोकरांसह हुक्केरी नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रमस्थांनी दिला आहे. या वेळी श्रीराम सेनेचे उत्तर प्रांत सरचिटणीस शिवराज अंबारी यांनी नगरपरिषदेने मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली.


Recent Comments