बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, घटना घडून १२ तास उलटून गेले तरी पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती न देता मौन बाळगल्याने संशय व्यक्त होत आहे.

जमखंडी शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आपापसातच मोठा वाद आणि हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतानाही, स्थानिक जमखंडी डीवायएसपी आणि सीपीआय या अधिकाऱ्यांकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या संदर्भात बागलकोटचे पोलीस अधीक्षक (एसपी) सिद्धार्थ गोयल यांच्याशी संपर्क साधला असता, एफआयआर (FIR) नोंदवल्याशिवाय माहिती देता येणार नाही असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. व्हिडिओच्या आधारे स्वतःहून (सुमोटो) गुन्हा दाखल करण्याची संधी असतानाही पोलीस केवळ तक्रारीची वाट पाहत आहेत. यामुळे पोलीस आणि स्थानिक भाजप आमदारांमध्ये साटेलोटे तर नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.


Recent Comments