कागवाड मतदारसंघाचे आमदार राजू कागे यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त अथणी शहरात ज्येष्ठ नेते गजानन मंगसुळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना फळवाटप करून वाढदिवस साजरा केला. या वेळी सरकारी रुग्णालयातील रुग्णांनाही फळांचे वाटप करण्यात आले.


आमदार राजू कागे यांच्या जनहितार्थ कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. आमदार कागे हे मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र झटत असून, त्यांचा वाढदिवस अशा सामाजिक उपक्रमाने साजरा करणे हा अभिमानाचा क्षण असल्याची भावना गजानन मंगसुळी यांनी व्यक्त केली.


या प्रसंगी आमदारांचे शेकडो कार्यकर्ते, प्रमुख नेते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी आमदारांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


Recent Comments