Khanapur

हवालदार जगदीश काद्रोळ्ळी यांचा सत्कार

Share

कित्तूर तालुक्यातील बैलूर निष्कल मंडपात आयोजित बसवजयंती आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात, नुकतेच मुख्यमंत्री पदक मिळवलेले खानापूर पोलीस ठाण्याचे कार्यक्षम हवालदार जगदीश काद्रोळ्ळी यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

खानापूर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असणाऱ्या जगदीश काद्रोळ्ळी यांचा मुख्यमंत्री पदक देऊन गौरव करण्यात आला असून त्यांचा बैलूर निष्कल मंडपाचे पूज्य श्री निजगुणानंद महास्वामीजी यांच्या दिव्य उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून जगदीश काद्रोळ्ळी यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले.

यावेळी जनवाडचे पूज्य श्री मल्लिकार्जुन महास्वामीजी, मुदगलचे पूज्य श्री महांंत महास्वामीजी, मुम्मिगट्टीचे श्री बसवानंद स्वामीजी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Tags: