दिव्यांग मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी, तसेच त्यांच्या मनोरंजनासाठी उडुपीमधील ब्रम्हगिरी येथील बालभवनात राज्यातील पहिल्या ‘सामर्थ्य वन पार्क’चे भूमिपूजन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.


या योजनेसाठी महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ४ कोटी ९० लाख रुपये यासाठी खर्च केले जाणार असून, यामध्ये दिव्यांग मुलांसाठी थेरपी स्विंग्ज, संगीत वाद्ये, स्पर्श संवेदी मार्ग आणि विशेष मल्टिसेंसर झोन तयार केले जाणार आहेत. हे पार्क संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करत हे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण करून आपल्याच कार्यकाळात याचे उद्घाटन केले जाईल, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.


या प्रसंगी जिल्हाधिकारी स्वरूप टी.के. आणि जिल्हा पंचायतीचे सीईओ प्रतीक बयाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments