कामगारांनी श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे काम केले तरच खऱ्या अर्थाने कष्टाला मूल्य प्राप्त होते, असे मत कर्नाटक वीज निगमाचे निवृत्त कर्मचारी के. बी. बडिगेर यांनी व्यक्त केले.


हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशयाजवळील घटप्रभा योजना परिसरातील खुल्या रंगमंचावर राष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी कर्मचारी आणि कामगार नेते के. बी. बडिगेर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी बोलताना त्यांनी १२ व्या शतकातील बसवेश्वरांच्या विचारांचा संदर्भ देत आजच्या काळात या विचारांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमात बोलताना कार्यकारी अभियंता डी. बसवराज यांनी घटप्रभा वीज केंद्रातील कामगारांच्या कौशल्याचे कौतुक केले. कामगारांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच गेल्या सलग तीन वर्षांपासून केंद्राने विक्रमी वीज निर्मितीचे उद्दिष्ट साध्य केले असून याबद्दल सर्व कामगार अभिनंदनास पात्र आहेत, असे डी. बसवराज यांनी सांगितले.
या वेळी व्यासपीठावर केपीसी एम्प्लॉईज युनियनचे संचालक एस. जगन्नाथ, आसिफ बंदेनवाज, संतोष कांबळे, हर्डीकर आणि भरत सिंगे उपस्थित होते. या प्रसंगी आयेशा हस्मा, सी. पी. सुष्मा, महेश पाटील, विठ्ठल नाईकवाडी, सुनील आणि भरत तळवार आदी उपस्थित होते.


Recent Comments