सोन्याच्या साखळ्या आणि बंद घरांना लक्ष्य करून चोऱ्या करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात धारवाड शहर पोलिसांना यश आले आहे.

धारवाड शहर आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या हुबळी येथील असीफ काशिमसाब बेग आणि अम्मिनभावी गावातील गुरुप्रसाद शिवानंद उळ्ळीगेरी या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ४,५०,००० रुपये किमतीचे ३१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३९,६०० रुपये किमतीचे १२४ ग्रॅम चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

सध्या पोलीस या आरोपींची अधिक चौकशी करत आहेत. शहर पोलिसांच्या या धाडसी कारवाईबद्दल पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.


Recent Comments