Hukkeri

हुक्केरीमध्ये सार्वजनिक मोफत आंबिल सेवेचा प्रारंभ

Share

हुक्केरी शहरातील विजय रऊदी समाज सेवा संस्थेच्या वतीने नागरिकांसाठी मोफत आंबिल सेवा सुरू करण्यात आली आहे. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

हुक्केरी शहरात तापमानाचा पारा वाढत असल्याने दुपारी नागरिक हैराण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन बसस्थानकाजवळ विजय रऊदी समाज सेवा संस्थेतर्फे मोफत आंबिल आणि थंड पाण्याची सोय करण्यात आली असून गवीश रऊदी यांनी याचे उद्घाटन केले.

दरवर्षी उन्हाळ्यात दोन महिने मोफत आंबिल केंद्र सुरू ठेवण्याची परंपरा रऊदी कुटुंबाने यावर्षीही कायम राखली आहे, असे गवीश रऊदी यांनी सांगितले.

Tags: