बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक कक्केरी गावात वरुणराजाने अक्षरशः थैमान घातले आहे. काल झालेल्या भीषण वादळी पावसामुळे संपूर्ण परिसराची दाणादाण उडाली असून, एक महाकाय वृक्ष मुळासकट उपटून पडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ऐतिहासिक कक्केरी गावात काल सायंकाळी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. सुरुवातीला पावसाचा जोर कमी वाटत असतानाच अचानक सुटलेल्या वेगवान वादळाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, एक मोठा वृक्ष क्षणार्धात जमिनीवर कोसळला. हे दृश्य पाहताना अंगावर शहारे येत असून, एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे निसर्गाचा कोप पाहायला मिळाला.

या निसर्ग कोपाचे व्हिडिओ आता कक्केरी ग्रामस्थांच्या चिंतेत भर टाकत आहेत. एकंदरीत काल झालेल्या महापावसामुळे खानापूर तालुका पूर्णपणे विस्कळीत झाला असून जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


Recent Comments