बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. विहिरीजवळील झाडाची फांदी कापताना तोल गेल्याने विहिरीत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

बदामी तालुक्यातील मुष्टीगेरी गावातील सोिमलिंगप्पा द्यामण्णावरा (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमलिंगप्पा हे एका खोल विहिरीजवळील झाड कापण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय घसरून ते विहिरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बदामी तालुका रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाची केरूूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.



Recent Comments