Dharwad

धारवाडमध्ये भव्य जिल्हा लस कोठाराचे उद्घाटन

Share

धारवाडमधील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आवारात नूतन जिल्हा लस कोठाराचे उद्घाटन आज पार पडले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी संयुक्तपणे या केंद्राचे लोकार्पण करून सुविधांची पाहणी केली.

धारवाड जिल्ह्यासाठी येणाऱ्या विविध लसी आणि आवश्यक औषधांच्या शास्त्रशुद्ध साठवणुकीसाठी या कोठाराची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या केंद्रामुळे लसींचा साठा दीर्घकाळ सुरक्षित ठेवणे शक्य होणार आहे. मंत्र्यांनी यावेळी केंद्रातील शीतगृह व इतर तांत्रिक यंत्रणेची सविस्तर माहिती घेतली.

याप्रसंगी आमदार अरविंद बेल्लद, एन.एच. कोनरेड्डी, एच.एफ. जक्कप्पण्णवर , महापौर ज्योती पाटील, जिल्हाधिकारी आर. स्नेहल यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. या नवीन सुविधेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना लसींचा पुरवठा करणे अधिक सोपे होणार आहे.

Tags: