हुक्केरी तालुक्यातील मदमक्कनाळ येथील महालक्ष्मी द्यामव्वा देवीच्या नूतन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा धार्मिक वातावरणात पार पडला. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या क्षेत्रात मूर्ती प्रतिष्ठापनेसह ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.


मदमक्कनाळची महालक्ष्मी द्यामव्वा देवी भाविकांच्या इष्टार्थ पूर्ती करणारी कामधेनू आणि कल्पवृक्ष आहे. या क्षेत्राचे महात्म्य मोठे असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असे मुख्य पुजारी मल्लप्पा बडीगेर यांनी म्हटले.

मदमक्कनाळची द्यामव्वा देवी इतिहास आणि पुराणप्रसिद्ध आहे. आज नूतन मूर्तीची विशेष होम-हवन आणि धार्मिक विधींद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे, अशी माहिती सवदत्ती शिरसंगी महाकालिका मंदिराचे पुजारी महादेव आचार्य यांनी दिली.
गावातील महिलांनी दरवर्षीप्रमाणे देवीची ओटी भरून सुख-समृद्धीसाठी संकल्प केला. या धार्मिक सोहळ्यात चन्नबसय्या हिरेमठ, शिवानंद नायक, राजू मठपती, देवेंद्र नायक, एस. के. पाटील, हनुमंत आचार्य, के. एस. पाटील, राजू तेरणी यांच्यासह महालक्ष्मी ट्रस्ट कमिटीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांनी महामंगळारतीचा लाभ घेत दर्शन घेतले.


Recent Comments