hubbali

हुबळीत भरदिवसा चेन स्नॅचिंगचा थरार

Share

हुबळीतील सदाशिव नगर परिसरात भरदिवसा सोनसाखळी आणि पर्स चोरीच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुबळीत पायी चालणाऱ्या किंवा दुचाकीवर जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून मौल्यवान वस्तू लांबवण्याचे प्रमाण वाढले आहे. चोरटे विशेषतः वर्दळीच्या आणि निर्जन ठिकाणांचा फायदा घेऊन महिलांच्या हातातील पिशव्या आणि गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढत आहेत.

सदाशिव नगरमध्ये घडलेल्या या ताज्या घटनेमुळे स्थानिक नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. भरवस्तीत अशा घटना घडत असल्याने पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करावा आणि परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. सध्या पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Tags: