वैराग्य, भक्ती आणि समतेचे प्रतीक असलेल्या अक्कमहादेवी यांची जयंती लिंगायत महिला समाजाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महिलांनी अक्कमहादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.


शिवबसवनगर येथील लिंगायत भवनात आयोजित या सोहळ्यात बोलताना गजेंद्रगड येथील अक्का बलगाच्या अध्यक्षा संयुक्ता बंदी म्हणाल्या की, अक्कमहादेवी या १२ व्या शतकातील बसवेश्वरांच्या समकालीन असून त्यांनी जागतिक स्तरावर महिलांमध्ये सामाजिक जाणीव जागृत केली. कन्नड साहित्यातील पहिल्या बंडखोर कवयित्री आणि वचनकार म्हणून त्यांची ओळख असून, शिवमोगा जिल्ह्यातील उडुथडी येथे जन्मलेल्या अक्कमहादेवींचे विचार आजही जीवनात अंगीकारण्यासारखे आहेत.

अक्कमहादेवी यांची वचने आजही व्यक्तिमत्व विकासासाठी दीपस्तंभासारखी आहेत. त्यांनी बुद्धीपेक्षा भावनेला, शब्दांपेक्षा कृतीला आणि अधिकारापेक्षा अंतःकरणाला अधिक महत्त्व दिले आहे. साक्षात सृष्टीकर्त्यालाच पती मानून लौकिक जगाचा त्याग करणाऱ्या अक्कमहादेवींचा जीवनप्रवास अत्यंत रोमांचक असून त्यांनी मानवाला संस्कारक्षम कसे राहावे, याचा मार्ग दाखवला असल्याचे संयुक्ता बंदी यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला अध्यक्षा मधुमती हिरेमठ, सचिव रक्षा देगीनाळ, सहसचिव सरोजा निशाणदार यांच्यासह लिंगायत महिला समाजाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



Recent Comments