Hukkeri

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात

Share

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास शाश्वत कृषी विकास शक्य असून, जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल, असे प्रतिपादन न्यायाधीश आदित्य कलाल यांनी केले.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त हुक्केरी कृषी विभाग, विधी सेवा समिती आणि वकील संघ यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायाधीश आदित्य कलाल यांनी केले. रासायनिक खतांचा वापर टाळून हवामानानुसार पिकांचे नियोजन केल्यास शेतकरी आर्थिक प्रगती साधू शकतील, असे आदित्य कलाल यांनी यावेळी म्हटले.

व्यासपीठावर सरकारी वकील अनिल करोशी, वकील संघाचे अध्यक्ष के. बी. कुरबेट, उपाध्यक्ष बी. एम. जिनराळे, सचिव एस. जे. नदाफ, कृषी समाजाचे अध्यक्ष बाबू मगेन्नवर आणि एस. बी. दोडमणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जमिनीची सुपीकता जपण्यासाठी आणि रासायनिक खतांच्या दुष्परिणामांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे कृषी विभागाचे सहाय्यक संचालक आर. बी. रायकर यांनी सांगितले.

या मेळाव्यात हुक्केरी तालुक्यातील शेतकरी आणि विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. प्रामुख्याने महिला शेतकऱ्यांनी उपस्थित राहून शेतीमधील आपल्या अनुभवांचे आदानप्रदान केले.

Tags: