धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाचा ७५ वा पदवीदान सोहळा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत आज विद्यापीठ परिसरातील गांधी भवन येथे उत्साहात पार पडला.

या पदवीदान सोहळ्याप्रसंगी इस्त्रोचे (ISRO) माजी अध्यक्ष डॉ. ए.एस. किरणकुमार यांनी दीक्षान्त भाषण केले, तर उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. या विशेष प्रसंगी राज्यपालांच्या हस्ते तीन मान्यवरांना ‘मानद डॉक्टरेट’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये ओडिशामधील शिक्षणतज्ज्ञ प्रो. अच्युत सामंत, हुबळीच्या मजेठिया फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र मजेठिया आणि बेळगावचे सुपुत्र व कर्नाटकचे मुख्य निवडणूक आयुक्त जी.एस. संग्रेशी यांचा समावेश आहे.
या सोहळ्यात एकूण २५,७४३ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये २५२ पीएचडी, ४,५८७ पदव्युत्तर (PG), २०,७४० पदवी (UG), ९५ विधी (Law) आणि ६९ डिप्लोमा पदव्यांचा समावेश आहे. तसेच ११३ गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण २७० सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक आणि विद्यार्थी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments