पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल दिले जाणारे प्रतिष्ठेचे ‘मुख्यमंत्री पदक’ बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथील कॉन्स्टेबल जगदीश काद्रोळी यांना प्रदान करण्यात आले.
aबेळगाव जिल्ह्यातील खानापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल जगदीश काद्रोळी यांची २०२५-२६ या वर्षासाठीच्या मुख्यमंत्री पदकासाठी निवड झाली आहे. बेंगळुरूमध्ये पार पडलेल्या पोलीस ध्वज दिन समारंभात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काद्रोळी यांना पदक देऊन गौरविले. जगदीश काद्रोळी यांची कर्तव्यनिष्ठा आणि जनस्नेही पोलीस सेवेची मुख्यमंत्र्यांनी यावेळी दखल घेतली.
या सोहळ्याला गृहमंत्री जी. परमेश्वर, राज्याचे पोलीस महासंचालक आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा सन्मान खानापूर तालुका आणि बेळगाव जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. जगदीश काद्रोळी यांच्या या यशाबद्दल पोलीस विभागातील सहकारी आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


Recent Comments