बैलहोंगल तालुक्यातील हारुगोप्प गावात जय श्री हनुमान युवक मंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने हनुमान जयंती साजरी करण्यात आली. गुरुवारी पहाटे पत्रय्या स्वामी हिरेमठ यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधी पार पडले.
हनुमान जयंतीनिमित्त पहाटे रुद्राभिषेक आणि विशेष पूजा विधी पार पडले. या निमित्ताने मल्लिकार्जुन भजनी मंडळाच्या वतीने मंदिरात भजन, पालखी सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील प्रमुख मार्गांवरून पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखीसमोर वीरेश्वर डोल पथक आणि भजनी मंडळाने सादरीकरण केले. त्यानंतर हारुगोप्प गावात पालखी सोहळा पार पडला. यावेळी मान्यवरांचा सत्कार करून गौरविण्यात आले. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमात आनंद कुरबर, सोमप्पा मरकट्टी, बसवराज जक्कन्नवर, शिवानंद संकन्नवर, नागप्पा नायक आणि सागर जक्कन्नवर यांच्यासह हारुगोप्प गावातील नागरिक आणि युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments