बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. भुरणकी गावातील दोन आरोपींना दोषी ठरवत पोक्सो न्यायालयाने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भुरणकी गावामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची सुनावणी पोक्सो न्यायालयात पार पडली असता न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला.
या प्रकरणात मोसीन काशीमसाब सावकार आणि इरफान निसार वस्तद या दोघांविरुद्धचे आरोप सिद्ध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी दोन्ही दोषींना प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याचे आदेश दिले.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने वकील एल. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली असल्याचे एल. व्ही. पाटील यांनी सांगितले.


Recent Comments