Khanapur

पुदुच्चेरीमध्ये डॉ. अंजली निंबाळकर यांचा काँग्रेससाठी झंझावाती प्रचार

Share

एआयसीसी सचिव आणि खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर या पुदुच्चेरीमधील आर्यकुप्पम येथे काँग्रेस उमेदवारासाठी जोरदार प्रचार करत आहेत. आपल्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि सेवाभावी वृत्ती जनतेसमोर मांडून अंजली निंबाळकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

पुदुच्चेरी निवडणुकीच्या प्रभारी असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी आर्यकुप्पम मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार विजयलक्ष्मी यांच्या प्रचारासाठी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “विजयलक्ष्मी या अत्यंत सुसंस्कृत, मातृत्वाची भावना असलेल्या आणि उच्चशिक्षित महिला आहेत. त्यांच्या पतीने आमदार म्हणून केलेली लोकहितकारी कामे कौतुकास्पद आहेत. पतीच्या निधनानंतरही विजयलक्ष्मी यांनी मतदारसंघातील लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन सर्वांची मने जिंकली आहेत. त्यामुळे या कार्यक्षम महिला उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे.” डॉ. अंजली निंबाळकर यांच्या आगमनामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, त्यांच्या प्रचार मोहिमेला सर्वसामान्यांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.

Tags: