बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील चिक्कमुनवळ्ळी गावच्या शिवारात अवैधपणे तयार करून विक्री केली जाणाऱ्या हातभट्टीच्या अडड्यावर नंदगड पोलिसांनी यशस्वी छापा टाकला आहे.
खानापूर तालुक्यातील चिक्कमुनवळ्ळी येथील भिमप्पा यल्लप्पा दळवाई हा व्यक्ती कल्लाप्पा मीटगार यांच्या शेताजवळील ओढ्यात हातभट्टीची दारू तयार करून विक्री करत होता. यामुळे चिक्कमुनवळ्ळी आणि हिरेमुनवळ्ळी गावातील तरुण तसेच नागरिक दारूच्या आहारी जात होते आणि गावातील शांतता व सुसंवाद बिघडत होता. याबद्दल खात्रीशीर माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी तातडीने हालचाल करत या अडड्यावर छापा टाकला.
नंदगडचे पोलिस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांच्या नेतृत्वाखाली, बीट हवालदार नीलकंठ चंदरगी आणि विजय पाटील यांनी माहिती गोळा करून ही मोहीम फत्ते केली. हातभट्टी दारू तयार करण्यात गुंतलेल्या भिमप्पा दळवाई याला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या समयोचित कारवाईबद्दल हिरेमुनवळ्ळी आणि चिक्कमुनवळ्ळी गावातील महिला व ज्येष्ठांनी मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त केले आहे.


Recent Comments