धारवाडच्या बाहेरील नुग्गीकेरी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक टिप्पर उलटल्याची घटना शनिवारी मध्यरात्री कलगटगी रस्त्यावर घडली आहे.

KA 14-C 9330 क्रमांकाचा हा टिप्पर कलगटगी मार्गावरून येत असताना नुग्गीकेरीजवळ पोहोचताच चालकाचा ताबा सुटला आणि वाहन अचानक रस्त्याच्या कडेला उलटले. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत टिप्पर चालक आणि क्लिनर दोघेही जखमी झाले असून, स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला असून पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.


Recent Comments