बागलकोटच्या नवनगरमध्ये आज संध्याकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला. रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका आणि इनोव्हा कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघाताची दृश्ये काळजाचा थरकाप उडवणारी आहेत.

बागलकोट नवनगरमधील केएसआरटीसी सर्कलजवळ भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने रुग्णवाहिकेला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रुग्णवाहिका थेट रस्त्यावरच उलटली. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि उलटलेल्या रुग्णवाहिकेतील रुग्णासह इतर कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले.
दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना कोणतीही जीवितहानी झालेली नाही. किरकोळ जखमांवर सर्वजण बचावले असून, स्थानिकांनी दाखवलेल्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली आहे.


Recent Comments