Khanapur

वनविभागातील कर्तव्यदक्षक अधिकारी एस. एस. निंगाणी यांची डीएफओ पदी बढती

Share

वनविभागात चार दशकांपासून उल्लेखनीय सेवा बजावणारे अधिकारी एस. एस. निंगाणी यांची राज्य सरकारने डीएफओ पदी बढती केली आहे. या पदोन्नतीनंतर त्यांची बेळगाव येथील दक्षता पथकाचे विभागीय वन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

खानापूर तालुक्यात वीस वर्षांहून अधिक काळ विविध पदांवर कार्यरत राहिलेले एस. एस. निंगाणी यांनी यापूर्वी होन्नावर येथे एसीएफ म्हणून सेवा दिली होती. त्यानंतर शिरसी येथे सहायक वनसंरक्षक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. वनविभागातील सुमारे चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर आता त्यांची बेळगाव दक्षता पथकाच्या डीएफओ पदी वर्णी लागली आहे.

आपल्या कार्यक्षमतेमुळे वनविभागात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या एस. एस. निंगाणी यांनी ज्या ठिकाणी सेवा बजावली, तिथे त्यांनी कामाचा ठसा उमटवला आहे. खानापूर तालुक्यात अनेक वर्षे कार्यरत असताना त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने आपली कर्तव्ये पूर्ण केली असून, सर्वसामान्यांमध्ये आपली एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे, अशी प्रतिक्रिया एस. एस. निंगाणी यांच्याबद्दल व्यक्त होत आहे.

Tags: