Dharwad

धारवाडमध्ये मुस्लिम तरुणाने जपली माणुसकी; मृत गायींवर केले अंत्यसंस्कार

Share

धारवाडमधील प्रसिद्ध पत्रेश्वर मंदिर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली होती, जिथे अज्ञात व्यक्तींनी चार मृत गायींना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले होते. मात्र, एका मुस्लिम तरुणाने पुढाकार घेत या मुक्या प्राण्यांना सन्मान मिळवून दिला आहे.

रस्त्याने जात असताना जुबेर बस्ती यांना कचऱ्यात पडलेल्या मृत गायी दिसून आल्या. त्यांनी वेळ न घालवता आपल्या मित्रांच्या मदतीने जेसीबी बोलावला आणि योग्य पद्धतीने खड्डे खोदून या गायींचे दफन केले. जुबेर यांच्या या संवेदनशील कृतीमुळे मुक्या प्राण्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली असून त्यांच्या या कार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

समाजात जातीय सलोखा आणि प्राण्यांप्रती दयाभाव जपणाऱ्या जुबेर बस्ती यांचे हे कार्य इतर तरुणांसाठी आदर्श ठरत आहे. गोवंशाचा आदर राखत त्यांनी केलेल्या या कामामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशा उपक्रमांमुळेच समाजात एकमेकांबद्दल आणि सर्व धर्मांबद्दल आदराची भावना वाढीस लागते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Tags: