Bagalkot

बागलकोट पोटनिवडणुकीसाठी वीरन्ना चरंतीमठ यांनी भरला उमेदवारी अर्ज

Share

बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीचे रणांगण आता चांगलेच तापले आहे. या निवडणुकीतील भाजप उमेदवार वीरन्ना चरंतीमठ यांनी केंद्रीय मंत्री आणि राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शनासह अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

बागलकोट पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवार वीरन्ना चरंतीमठ यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जगलासर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दर्शवला. नेत्यांच्या मोठ्या ताफ्यासह आलेल्या चरंतीमठ यांनी विजयाचा संकल्प करत निवडणूक आखाड्यात अधिकृतपणे उडी घेतली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडताना भाजप नेत्यांनी विजयाचे संकेत दिले. “बागलकोटच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी जनता वीरन्ना चरंतीमठ यांना नक्कीच पाठिंबा देईल,” असा विश्वास यावेळी बी.वाय. विजयेंद्र यांनी व्यक्त केला. प्रमुख नेते एकजुटीने प्रचारात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, क्षेत्रात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tags: