Dharwad

हुबळीत विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Share

धारवाड जिल्ह्यातील हुबळी तालुक्यातील गामनगट्टी गावात एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. अभिषेक असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव येथील रहिवासी असलेला अभिषेक कामासाठी हुबळीत स्थायिक झाला होता. वर्षभरापूर्वीच त्याचा प्रेमविवाह झाला होता. आज सकाळी घरात कुणीही नसताना त्याने गळफास घेतला. पत्नी घरात परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरडाओरडा ऐकून जमलेल्या स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच नवनगर एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Tags: