Bagalkot

बागलकोट शहर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी प्रकाश तपशेट्टी

Share

बागलकोटमध्ये पोटनिवडणुकीचे वारे वाहत असताना सत्ताधारी काँग्रेसने आपली रणनीती बदलली आहे. पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी लिंगायत नेते प्रकाश तपशेट्टी यांची बागलकोट शहर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या संदर्भात जलसंपदा विभागाच्या शासन सचिव विजयलक्ष्मी एस. यांनी अधिकृत आदेश काढला असून ही नियुक्ती तातडीने लागू करण्यात आली आहे. आगामी पोटनिवडणुकीत उमेदवारीसाठी प्रकाश तपशेट्टी प्रबळ दावेदार मानले जात होते. आता त्यांना प्राधिकरणाचे अध्यक्षपद देऊन पक्षांतर्गत मतभेद मिटवण्याचा आणि समाजाची मते मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.

Tags: