Bagalkot

बागलकोटच्या विकास कामांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Share

बागलकोट जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे आज उत्साहात स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन केले.

विशेष हेलिकॉप्टरने आलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे नवनगर सेक्टर १ येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मानवंदना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

नवनगर सेक्टर १ मध्ये आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी अनेक विकास कामांची घोषणा केली. यावेळी पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.

या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी बागलकोट जिल्ह्याचे अनेक वर्षांचे स्वप्न असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अधिकृत पायाभरणी केली. यासह नवनगर परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले.

या कार्यक्रमाला मंत्री आर. बी. तिम्मापूर, जिल्ह्यातील आमदार, माजी मंत्री तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण बागलकोट शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बागलकोटमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिवंगत एच. वाय. मेटी यांचे स्वप्न पूर्ण केल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी अप्पर कृष्णा प्रकल्पातील बाधितांना नुकसानभरपाईच्या धनादेशांचे वाटप सुरू केले असून, राज्यातील ‘ई-स्वत्तु’ प्रणालीतील तांत्रिक अडचणी तातडीने सोडवण्याची ग्वाही दिली. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे काम ‘निवडणूक स्टंट’ नसून विकास प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. तसेच, गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करणे ही केंद्राची जबाबदारी असून राज्य सरकार केवळ वितरणाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले. पोटनिवडणूक उमेदवारांची निवड हायकमांड करणार असून २७ मार्चच्या बैठकीत अंतर्गत आरक्षणावर अंतिम निर्णय होईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

Tags: